औरंगाबाद – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. तसेच राज्यातील तरुणांनाही येत्या निवडणुकीत ऐतिहासिक कामगिरी करण्याचं आवाहन केलं आहे. तसेचआज आठ महिने झाले कर्जमाफी झाली का? निव्वळ घोषणा या सरकारनं केल्या असून ८६ हजार कोटींचा कर्जपुरवठा ९ लाख कोटीपर्यंत आम्ही पोहचवला. परंतु गेल्या साडेतीन वर्षात भाजप सरकारने फक्त २ लाखांची वाढ केली आणि कर्ज देण्याचे बंद केले आहे. या सरकारने राज्यातील जनतेला दिले काय तर फक्त बेरोजगारी आणि धार्मिक दंगली असा आरोपही शरद पवार यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेच्या समारोपादरम्यान ते बोलत होते.
दरम्यान मुस्लिम महिलांच्या सक्षमीकरणासाठी तीन तलाकचा कायदा करण्याचा विचार असेल तर मुस्लिम समाजातील प्रमुख लोकांना, धर्मगुरुंना विश्वासात घेवून बदल करायला हवा होता. मुस्लिम समाजाच्या कुराणामध्ये तसा संदेश असताना त्याच्या संदेशामध्ये हस्तक्षेप करण्यात आला. समाजात वेगळी स्थिती निर्माण करणार असाल तर त्याचे समर्थन आम्ही करणार नाही असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी औरंगाबादच्या विराट सभेमध्ये केले. शरद पवार यांनी या विराट सभेमध्ये सरकारला निर्वाणीचा इशारा देताना या राज्यातील तरुण येत्या निवडणूकीमध्ये ऐतिहासिक कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला. या विराट आणि ऐतिहासिक सभेमध्ये शरद पवारांनी तरुणांना हाक देताना या खोटारडया सरकारला खाली खेचण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
COMMENTS