भाजप, काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी संयुक्त आघाडीची घोषणा !

भाजप, काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी संयुक्त आघाडीची घोषणा !

कोलकाता – भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना केंद्रातील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी संयुक्त आघाडीची घोषणा करण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आगामी लोकसभा निवडणुका संयुक्त लढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकातामध्ये झालेल्या बैठकीत संयुक्त आघाडीची घोषणा केली आहे. देशातील सध्याची राजकीय स्थिती बदलण्याची गरज असून लोकांना आगामी निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस विरहित आघाडी हवी असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान या आघाडीबाबत अनेक पक्षांशी आमची चर्चा सुरू असून यात आम्हाला नक्कीच यश येईल, असा विश्वास ममता बॅनर्जी यांनी यांनी व्यक्त केला आहे. तसेच लोकांना चमत्काराची अपेक्षा असल्यामुळेच आम्ही भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांपासून समान अंतर राखून संयुक्त आघाडी उभारत असल्याचं के चंद्रशेखर राव यांनी म्हटलं आहे. तसेच ही आघाडी जनतेच्या भल्यासाठी काम करणार असून या आघाडीचे नेतृत्व एका व्यक्तीकडे न सोपवता सामूहिक असणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी आणि के चंद्रशेखर राव यांच्या आघाडीला आगामी निवडणुकीत किपत यश येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे..

COMMENTS