नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

मागच्या वर्षी आजच्या दिवशी म्हणजे 8 नोव्हेंबरला भाजप सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता.  या निर्णयाला आज वर्ष पूर्ण झालं आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विट केलंय. सरकारने काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी उचलेल्या पावलांना जनतेनं पाठिंबा दिल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी केलाय. जनतेच्या या पाठिंब्याबद्दल नोटाबंदीच्या वर्षपुर्ती निमित्त मोदींनी ट्विट्वरून आभार मानले.

भ्रष्टाचार आणि काळ्या पैश्यांविरोधातील लढाईत सहकार्य करणाऱ्या सर्वसामान्यांचे आभार, असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त केंद्र सरकारने सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिराती दिल्या असून यात नोटाबंदीमुळे झालेले फायदे सांगण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदी यांनीदेखील ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला असून सात मिनिटांच्या व्हिडिओतही नोटाबंदीमुळे सरकारने नेमके काय साधले याची मुद्देसूद माहिती देण्यात आली आहे. नोटाबंदीनंतर देशाच्या इतिहासात सर्वाधिक काळ्या पैशांचा शोध लागल्याचा दावा सरकारने केला आहे. 17.73 लाख संशयित प्रकरणे उघडकीस आली असून 23.22 लाख खात्यांमध्ये अंदाजे 3.68 लाख कोटी रुपयांची संशयित रोकड जमा करण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे. दहशतवाद आणि नक्षलवादावरही लगाम लावण्यात यश आले असून काश्मीरमधील दगडफेकीच्या घटनांमध्ये75 टक्के घट झाली. तर7.62 लाखांचे बनावट चलन सापडले. याशिवाय बोगस कंपन्यांना काळा पैसाही समोर आला आहे. 2.24 लाख बोगस कंपन्या बंद केल्याचे सरकारने सांगितले.

COMMENTS