“मुलाला निवडूण आणण्याचीही राणेंचा ताकद राहिली नाही”

“मुलाला निवडूण आणण्याचीही राणेंचा ताकद राहिली नाही”

मुंबई –  सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्यमंत्री दीपक केसरकर आणि राणे कुटुंबिय यांच्यातील वाद राज्याला सर्वश्रूत आहे. दोन्ही नेत्यांमध्ये सातत्याने एकमेकांवर चिखलफेक सुरू असते. नारायण राणेंचा मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेश आणि नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राणेंनी ग्रामपंचायत निवडणुकीत केलेला दावा यावरुन केसरकरांनी राणेंवर निशाणा साधला आहे.

नारायण राणे यांनी जिल्ह्यात त्यांचे समर्थक सरपंच निवडणू आल्याचा दावा केला आहे तो पूर्णपणे चुकीचा असल्याची टीका दीपक केसरकर यांनी केली आहे. आता ते सरपंच सोडा त्यांच्या मुलाला निवडणू आणण्याची ताकदही राणेंमध्ये राहिलेली नाही असा टोलाही केसरकर यांनी राणेंना हाणला आहे.

राणेंच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत. राणेंचे चारित्र्य मला माहित आहे. पण मी अजून सोज्वळता सोडलेली नाही असंही केसरकर म्हणाले. राणेंनी भाजपवर केलेले आरोप भाजप विसरलेली दिसते.  राणेंकडे बेहिशेबी मालमत्ता नाही हे भाजपने जाहीर करावे आणि त्यांना भाजपात घ्यावे असं आव्हानही केसरकर यांनी भाजपला केलं आहे.

COMMENTS