‘या’ तारखेला ठरणार विरोधी पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार, शरद पवारांचं नाव आघाडीवर !

‘या’ तारखेला ठरणार विरोधी पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार, शरद पवारांचं नाव आघाडीवर !

मुंबई – लोकसभा निवडणूक पार पडत आली आहे. परंतु विरोधी पक्षांकडून अजूनपर्यंत पंतप्रधानपदाचा चेहरा ठरवण्यात आला नाही. त्यामुळे विरोधी पक्षांकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोणाला ठरवलं जाणार याकडे लक्ष लागलं होतं. परंतु विरोधी पक्षांकडून लवकरच पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला जाणार असल्याचं दिसत आहे. पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची 21 मे रोजी दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीत पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला जाणार आहे.

याबाबत चंद्राबाबू नायडू यांनी माहिती दिली असून

भाजपविरोधी आघाडीच्या या बैठकीत पंतप्रधानपदाच्या नावाबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीला तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी, बसपा अध्यक्षा मायावती, अखिलेश यादव, शरद पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान पंतप्रधानपदाच्या उमेदवारांच्या.यादीत शरद पवार यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS