11 मे रोजी पंतप्रधान मोदी करणार नेपाळचा दौरा !

11 मे रोजी पंतप्रधान मोदी करणार नेपाळचा दौरा !

नवी दिल्ली  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ११ मेला नेपाळ दौऱ्यावर जाणार आहेत. दोन्ही देशांमध्ये संबंध आणखी मजबूत करण्यासाठी हा दौरा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ११ मे रोजी ते काठमांडू आणि जनकपूर जाणार आहेत.२०१५ मध्ये नेपाळी संविधानाच्या घोषणेनंतर हा पंतप्रधान मोदींचा पहिला दौरा असून त्यांच्या कार्यकाळाता हा पंतप्रधान मोदींचा हा तिसरा नेपाळ दौरा आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच नेपाळचे पंतप्रधान ओली हे भारताच्या दौ-यावर आले होते. ३ दिवसाच्या या दौऱ्यात दोन्ही नेत्यांमध्ये भारत आणि नेपाळ यांच्यात संरक्षण आणि व्यापार अशा मुद्द्यावर सहयोगाबाबत चर्चा झाली. भारत आणि काठमांडूमध्ये कनेक्टिविटी वाढवण्यासाठी देखील यावेळी चर्चा झाली होती. त्यानंतर मोदींच्या दौ-यात दोन्ही देशांमध्ये आणखी घट्ट संबंध निर्माण होण्यासाठी काही निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

 

COMMENTS