अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणा-यास आता फाशीची शिक्षा !

अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणा-यास आता फाशीची शिक्षा !

नवी दिल्ली  अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या आरोपीस यापुढे पाशीची शिक्षा देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.  त्यामुळे यापुढे आता 12 वर्षांपर्यंतच्या मुलींवर बलात्कार करणाऱ्या दोषींना फाशी मरेपर्यंत पाशी देण्यात येणार आहे. या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

दरम्यान याबाबात आता सरकार अध्यादेश जारी करणार असून काश्मीरमधील कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्स’ अर्थात पोक्सो कायद्यात सुधारणा करण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.  कठुआ बलात्कार प्रकरणानंतर देशभरातून केंद्र सरकारवर टीका केली जात होती. त्यानंतर सरकारनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

 

COMMENTS