विधानसभा निवडणुकीबाबत प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा !

विधानसभा निवडणुकीबाबत प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा !

सोलापूर – भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे.   विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षासोबत जाणार नसल्याचं आंबेडकर यांनी जाहीर केलं आहे. तसेच राज्यातील सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे. ते सोलापुरात बोलत होते.

दरम्यान राज्यात विधानसभेच्या 288 जागा आहेत. त्यामुळे या सर्व जागांवर प्रकाश आंबेडकर आपले उमेदवार उभे करणार आहेत. या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचे 48 उमेदवार उतरवले होते आणि युती-आघाडीसमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला ते आघाडीत जातील अशी चर्चा होती. परंतु
बोलणी फिस्कटल्यामुळे त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी मात्र आंबेडकर यांनी अगोदरच स्वबळाची घोषणा केली आहे.

COMMENTS