पंतप्रधानपदासाठी ‘या’ नेत्याला प्रकाश आंबेडकरांचा जाहीर पाठिंबा !

पंतप्रधानपदासाठी ‘या’ नेत्याला प्रकाश आंबेडकरांचा जाहीर पाठिंबा !

मुंबई – वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधानपदासाठी आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.  भाजपला स्वत:च्या जोरावर बहुमत न मिळाल्यास नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकणार नाहीत. देशात भाजपशिवाय अन्य पक्षाचा पंतप्रधान व्हावा, अशी आमची इच्छा आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसपेक्षाही थर्ड फ्रंटचा पंतप्रधान व्हावा, असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आम्ही मायावतींना पाठिंबा द्यायला तयार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं आहे.

दरम्यान काँग्रेस आणि भाजपशिवाय तिसऱ्या आघाडीतून शरद पवारांचं नाव पुढे आल्यास आम्ही शरद पवारांना कदापि पाठिंबा देणार नाही तर विरोधच करू. शरद पवारांना मी पंतप्रधानपदाच्या लायक मानत नाही. ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि केसीआर हे देखील कधीच पंतप्रधान होणार नाहीत,’ असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

COMMENTS