‘राहुल गांधींच्या अध्यक्षपदाला कायदेशीर आव्हान देणार?’

‘राहुल गांधींच्या अध्यक्षपदाला कायदेशीर आव्हान देणार?’

दिल्ली – काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून राहुल गांधींची सोमवारी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधी हे काँग्रेसचे १८ वे अध्यक्ष झाले आहेत. तसेच गांधी घराण्यातील अध्यक्ष होणारे ते सहावे व्यक्ती आहेत. यापूर्वी सोनिया गांधी यांनी १९ वर्ष अध्यक्षपदाची सूत्र सांभाळली होती. काँग्रेसमधील याच घराणेशाहीविरोधात पुन्हा एकदा काँग्रेसचे बंडखोर नेते शहजाद पुनावाला यांनी आवाज उठवला आहे. राहुल गांधींवर आरोप करत त्यांच्या अध्यक्षपदाला कायदेशीर आव्हान देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच आजचा काळा दिवस असून काँग्रेसला घराणेशाही मुक्त करण्यासाठी आंदोलन करणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

यापूर्वीही राहुल गांधींच्या अध्यक्षपदाला पुनावाला यांनी विरोध केला होता. काँग्रेसमधून विरोध करणारे ते एकमेव बंडखोर नेते आहेत. तसेच काँग्रेसला घराणेशाहीमुक्त करण्यासाठी अकबर रोड ते अमेठी असे आंदोलन करणार असल्याचं त्यांनी ट्वीट केलं आहे. राहुल गांधी यांचे अशा प्रकारे अध्यक्ष होणे ही शरमेची बाब असून त्यांना अध्यक्षपद देण्यात यावे म्हणून निवडणूक फिक्स करण्यात आल्याचे पुरावे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. एवढच नाहीतर पूनावाला यांनी त्यांचा ट्विटरवरचा डीपी #Black Day या नावाने बदलला आहे.

COMMENTS