पुणे – राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल शिवसेने वाटेवर असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.बांदल यांनी नुकतीच शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट घेतली आहे. एवढच नाही तर त्यांनी बंद दाराआड जवळपास एक तास चर्चा केली आहे. त्यामुळे बांदल लवकरच शिवबंधना’त अडकणार असल्याची चर्चा सुरू आहेत.
परंतु शरद पवार साहेबांनी मला विधानसभेच्या उमेदवारीबाबत शब्द दिलेला आहे. त्यामुळे पवार यांच्यावर माझा पूर्ण विश्वास असल्याचं बांदल यांनी म्हटलं आहे. शिवाजीराव आढळराव यांच्याशीच माझी चर्चा राजकीय चर्चा झालेली नसून माझी मुख्यमंत्र्यांसोबत देखील अर्धा तास बातचीत झालेली आहे. त्यामुळे त्यांना भेटलो म्हणून पक्ष सोडणार असा त्याचा अर्थ होत नसल्याचं बांदल यांनी म्हटलं आहे.
COMMENTS