काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी येणार मुंबईच्या दौ-यावर !

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी येणार मुंबईच्या दौ-यावर !

मुंबई – काँग्रेच्या अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच राहुल गांधी मुंबईच्या दौ-यावर येणार आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात राहुल गांधी मुंबईचा दौरा करणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली आहे. राज्यात काँग्रेसबाबत जे नकारार्थी वातावरण निर्माण झाल आहे ते पुन्हा सकारात्मक करण्यासाठी राहुल गांधी मुंबईत सभा घेणार असल्याचं निरुपम यांनी म्हटलं आहे. तसेच सध्या मुंबईत संकल्प सभांचं आयोजन सुरू असल्याचंही निरुपम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान २०१९मध्ये पार पडणा-या निवडणुकांसाठी काँग्रेसकडून आतापासूनच मोर्चे बांधणी सुरु झाली असल्याचं दिसत आहे. काँग्रेसमधील कार्यकर्त्यांमधील उत्साह दुनावण्यासाठी राहुल गांधी यांच्याकडून प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना आगामी निवडणुकीत पक्षाची फळी मजबूत करण्यात कितपत यश येईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

COMMENTS