शिवसेनेकडून भाजपविरोधात आरपारची तयारी, भाजपच्या घोटाळ्यांची कुंडली पदाधिका-यांना वाटली, कुंडलीत नेमकं काय आहे ? काय ठऱली रणनिती ? वाचा सविस्तर !

शिवसेनेकडून भाजपविरोधात आरपारची तयारी, भाजपच्या घोटाळ्यांची कुंडली पदाधिका-यांना वाटली, कुंडलीत नेमकं काय आहे ? काय ठऱली रणनिती ? वाचा सविस्तर !

मुंबई – शिवसेनेच्या पदाधिका-यांची आज महत्वाची बैठक झाली. शिवसेना भवन इथे झालेल्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेसह पक्षाचे नेते, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख उपस्थित होते. भाजपच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे काय आहेत. याची माहिती नेते आणि पदाधिका-यांना देण्यात आली. त्याची पुस्तिकाच तयार करण्याता आली आहे. राज्यभरात भाजपचा हा भ्रष्टाचाराचा चेहरा उघड करण्यासाठी शिवसेनेनं जय्यत तयारी केली आहे. राणेंचा मंत्रिमंडळात समावेश झालाच तर काय भूमिका घ्यायची याचीही चर्चा बैठकीत झाली आहे.

          सेनेकडून वाटप करण्यात आलेल्या पुस्तिकेत भाजपाचे सर्व भ्रष्ट मंत्री आहेत पण त्यात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या चिक्की घोटाळा दिसत नाही. सेना आणि गोपानाथ मुंडे प्रेम आणि कुटूंब जिव्हाळ्याचा संबंध यामुळे पंकजा मुंडे यांच्या भ्रष्टाचाराच्या मुद्दाकडे लक्ष दिले.

      या बैठकीत भाजपविरोधात वातावरण तापवा, असे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे एकूणच शिवसेनेनं आता भाजप विरोधात आरपारची लढाई लढण्याची तयारी केल्याचं दिसून येत आहे. शिवसनेेनं बैठकीत वाटलेली घोटाळेबाज भाजप ही पुस्तिका वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…..

Bjp ghotala

COMMENTS