हॉट गर्ल सनी लिओनीच्या ‘त्या’ कार्यक्रमावरुन कर्नाटकातील राजकारण तापलं !

हॉट गर्ल सनी लिओनीच्या ‘त्या’ कार्यक्रमावरुन कर्नाटकातील राजकारण तापलं !

बंगळूरु  – कर्नाटकमध्ये ३१ डिसेंबर रोजी अभिनेत्री सनी लिओनीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला कर्नाटकातील अनेक संघटनांनी विरोध केल्याचं पहायला मिळालं आहे. बंगळुरूमध्ये हा कार्यक्रम होणार होता. परंतु प्रो-कन्नड संघटना कर्नाटक रक्षक वेदिका युवा सेनेच्या सदस्यांनी या कार्यक्रमाला जोरदार विरोध करत हा कार्यक्रम झाला तर सामूहिक आत्महत्या करू, अशी धमकीहा दिली. तसेच या कार्यकर्त्यांनी सनीच्या कार्यक्रमाचे पोस्टर्सही जाळले.

‘सनी लिओनीची पार्श्वभूमी चांगली नसून नव्या वर्षाच्या निमित्तानं तिची उपस्थिती आमच्या सांस्कृतिक जमिनीवर एक हल्लाच असल्याचं या संघटनेचं म्हणणं आहे.

या संघटनेच्या विरोधानंतर कर्नाटकचे गृहमंत्री रामालिंगा रेड्डी यांनीही, सनी लिओनी भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध आहे असं म्हणत कार्यक्रम रद्द करण्याचं आणि आंदोलनाचं समर्थन केलं होतं. कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंग रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षेच्या कारणावरून आम्ही या कार्यक्रमाला मंजूरी दिलेली नाही. या कार्यक्रमाला सतत विरोध करण्यात येत होता. गेल्या वर्षी नववर्षाच्या कार्यक्रमात एका तरुणीची छेडछाड झाल्याची घटना घडल्यानंतर उच्च न्यायालयाने अशा कार्यक्रमांना मंजूरी न देण्याचे आदेश दिले आहेत. असं ते म्हणाले.

एकूणच सनी लिओनीच्या या कार्यक्रमावरुन कर्नाटकातील राजकारण तापलं असल्याचं पहायला मिळालं आहे.

 

COMMENTS