राणे मंत्रिमंडळात आले तरी चंद्रकांत दादाचा नं. 2

राणे मंत्रिमंडळात आले तरी चंद्रकांत दादाचा नं. 2

मुंबई –  मंत्रिमंडळ विस्तार होऊन नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार अशी चर्चा सुरू असतानाच मंत्रिमंडळातील सेवा ज्येष्ठतेच्या यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत विधानपरिषदेतील सभागृह नेत्याचे स्थान मंत्रिमंडळात दुसरे असेल असे नमूद करण्यात आले आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे विधानपरिषदेतील सभागृह नेते असल्याने मंत्रिमंडळात त्यांचे दुस-या क्रमांकाचे स्थान कायम राहणार आहे.

एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे दुसरे स्थान पाटील यांना मिळाले होते, ते मागील आठवडय़ात एक आदेश जारी करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायम केले आहे. राणेंचा मंत्रिमंडळात समावेशाची चर्चा सुरू आहे, त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला तर माजी मुख्यमंत्री म्हणून राज शिष्टाचारानुसार त्यांचे मंत्रिमंडळात दुसरे स्थान राहिले असते. मात्र त्या आधीच मंत्रिमंडळातील सेवा ज्येष्ठतेची यादी जाहीर करून दुसरे स्थान विधानपरिषदेतील सभागृह नेत्याला देण्यात आले आहे. त्यामुळे राणेंचा मंत्रिमंडळात समावेश झाला तरी चंद्रकांत पाटील यांचे दुसरे स्थान कायम राहिल.

COMMENTS