काँग्रेसचं महाअधिवेशन पाहा -LIVE

काँग्रेसचं महाअधिवेशन पाहा -LIVE

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. या राष्ट्रीय अधिवेशनात अध्यक्ष राहुल गांधी संबोधित करणार आहेत. पक्षाची दिशा कशी असेल हे राहुल गांधी स्पष्ट करतील. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणारे भाषण असणार आहे. त्याचबरोबर सरकारच्या फसव्या योजना, बेरोजगारी, औद्योगिक पिछेहाट, जातीय दंगे आणि लोकशाही कशी धोक्यात आहे, या मुद्द्याभोवती राहुल गांधी यांचे भाषण असणार आहे. त्यानंतर. अधिवेशनात महत्त्वाचे प्रस्ताव संमत केले जातील.

अधिवेशनात कोणकोणते प्रस्ताव संमत होणार 

१. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर प्रस्ताव
२. देशाच्या आर्थिक परिस्थिती वर प्रस्ताव
३. परराष्ट्र धोरणा संदर्भात प्रस्ताव
४. शेतक-यांची अवस्था आणि कृषी क्षेत्राच्या परिस्थितीवर प्रस्ताव
५. रोजगार संदर्भातचा प्रस्ताव
६. गरीबी निर्मुलन संदर्भात प्रस्ताव

अधिवेशनातील कार्यक्रम

उद्या : १७ मार्च २०१८

राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी सकाळी ९:३० वाजता अध्यक्षीय भाषण करतील.
दुपारी २:३० वाजता सोनिया गांधी सध्याच्या राजकीय परिस्थितीसंदर्भात संबोधित करतील. या भाषणात मोदी सरकारवर टीका केली जाईल. तसेच विरोधकांना सोबत घेऊन जाण्यासंदर्भात भाष्य केले जाईल.

१८ मार्च २०१८

संध्याकाळी ४ वाजता राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचे समारोपाचे भाषण होईल.

 

COMMENTS