गुजरात मंत्री मंडळात एकमेव मराठी मंत्री !

गुजरात मंत्री मंडळात एकमेव मराठी मंत्री !

वलसाड – गुजरातमध्ये भाजपनं तब्बल सहाव्यांदा सत्ता स्थापन केली आहे. मंगळवारी गुजरात मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यात मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह तब्बल 19 मंत्र्यांनी शपथ घेतली. या मंत्र्यांनी घेतलेल्या शपथविधी सोहळ्यात एका मराठी नेत्याचाही समावेश आहे. वलसाडमधील अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या उंबरगाव मतदारसंघातून निवडून आलेले रमणलाल पाटकर हे गुजरातचे मंत्री झाले आहेत. एकमेव मराठी मंत्री म्हणून ते सध्या चर्चेत आहेत.

या मतदार संघातून निवडून आलेल्या पाटकर यांनी काँग्रेसच्या अशोकभाई पटेल यांचा पराभव केला आहे. पाचवेळा ते या मतदारसंघातून निवडून आले आहेत. २०१२ मध्ये त्यांनी काँग्रेसच्याच गोविंदभाई पटेल यांचा पराभव केला होता. तर २००७ मध्ये भरतभाई धोडी यांना हरवलं होतं. त्याआधी १९९५ आणि १९९८ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये ते विधानसभेवर निवडून आले होते.

COMMENTS