मुंबई – भाजपचे अध्यक्ष अमित शाह हे उद्या गांधीनगर येथे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे गांधीनगरला जाणार आहेत. अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना उमेदवारी अर्ज भरताना हजर राहण्यासाठी विनंती केली असून त्यांनी ती स्विकारली आहे. उद्या म्हणजेच 30 एप्रिलला अमित शाह उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अमित शाह गांधीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. गांधीनगर हा भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचा मतदारसंघ असून यावेळी अमित शाह यांना येथून उमेदवारी देण्यात आली आहे.
यावरुन काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. रंग बदलणारे लोक कसे असतात हे दिसत असून रंग बदलणारे सरडेही मान खाली घालत असतील की आपल्यापेक्षा लवकर रंग बदलणारी माणसं आहेत. अशी टीका सावंत यांनी केली आहे. अफझलखानाचा अर्ज भरायला उंदरांची कुमक चालली असून ही महायुती नाही तर महाआपत्ती आहे. अफझलखानाच्या भेटीला संरक्षणातच जावे लागेल म्हणून संरक्षण मागितले असेल असंही सावंत यांनी म्हटलं आहे.
COMMENTS