सांगली – कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खळबळजनक शुलासा केला असून रयत क्रांती संघटना हा पक्ष नाही, मी अधिकृतपणे भारतीय जनता पक्षाचा क्रियाशील कार्यकर्ता आहे. माझा भाजप प्रवेश झाला असल्याचं खोत यांनी म्हटलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी देण्याआधीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी ही प्रक्रिया उरकली होती. “गळ्यात हार घालून सोहळा करण्याची गरज नसल्याचंही खोत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
दरम्यान सदाभाऊ छातीला रयत क्रांती संघटनेचा बिल्ला लावतात आणि गळ्यात भाजपचे उपरणं घालतात, मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नसल्याचा समज त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होता. परंतु आज त्यांनी केलेल्या या खुलाशामुळे त्यांचा हा गैरसमज दूर झाला आहे. “मी भाजपचा क्रीयाशील सभासद आहे. विधान परिषदेसाठी ए बी फॉर्म भरतानाच मी भाजप प्रवेश केला असल्याचंही ते म्हणाले आहेत.
COMMENTS