संजय निरुपम यांनी मानले नाना पाटेकर यांचे आभार !

संजय निरुपम यांनी मानले नाना पाटेकर यांचे आभार !

मुंबई –  मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी अभिनेता नाना पाटेकर यांचं कौतुक करत आभार मानले आहे. नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांची बाजू घेतल्याने, संजय निरुपम यांनी नानांचे आभार मानले. संजय निरुपम यांनी ट्विटरवर ट्विट करत, फेरीवाल्यांच्या अडचणी समजून घेऊन, त्यांच्या संघर्षाला साथ देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना अभिवादन असे म्हटले आहे.

नाना पाटेकर यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात फेरीवाल्यांची बाजू घेतली. भाकरीसाठी धडपडणाऱ्या फेरीवाल्यांच्या पोटावर पाय का देता, असा सवाल नाना पाटेकर यांनी उपस्थित केला.

 

 

COMMENTS