“मतदारांनो सावधान, भाजप माझी बनावट सेक्स सीडी मतदानाच्या आधी प्रसिद्ध करु शकते “

“मतदारांनो सावधान, भाजप माझी बनावट सेक्स सीडी मतदानाच्या आधी प्रसिद्ध करु शकते “

अहमदाबाद – गुजरातमध्ये जसजशी निवडणुकीची तारीख जवळ येत आहे. तसे राजकीय वातावरण गरम होत आहे. एकमेकांवर जोरदार चिखलफेक सुरू आहे. एकमेकांना अडचणीत आणण्याची एकही संधी विरोधक आणि सत्ताधारी सोडत नाहीत. पाटीदार समजाचा नेता हार्दिक पटेल यांनी असाच एक सनसनाटी आरोप भाजपवर केला आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

भाजपने माझी बनावट सेक्स सीडी तयार केली आहे.  माझी बदनामी करण्यासाठी त्याचा वापर भाजपकडून केला जाऊ शकतो. निवडणुक जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो असंही हार्दिक पटेल यांनी म्हटलं आहे. मतदानाच्या आधी ही बनावट सीडी प्रसिद्ध करुन भाजप मतदारांच्या मनात माझ्याविषयी संशय निर्माण करु शकते. मात्र मतदारांनी ते काय करतात ते फक्त पहावे आणि आनंद घ्यावा. त्याच्यावर विश्वास ठेऊ नये असं आवाहनही हार्दिक पटेल यांनी मतदारांना केलं आहे.

आता भाजप खरोखरच काही सीडी प्रसिद्ध करते का आणि त्यावर काय प्रतिक्रिया उमटतात ते पहावं लागेल. मात्र मतदानापर्यंत हा आरोप प्रत्यारोपाचा खेळ सुरूच  राहणार आहे.

COMMENTS