‘या’ विकृतीचा हा पराभव –संजय राऊत

‘या’ विकृतीचा हा पराभव –संजय राऊत

मुंबई – कर्नाटकात बहुमत सिद्ध करण्यात असमर्थ ठरलेले नवनिर्वाचीत मुख्यमंत्री  बी एस येडियुरप्पा यांनी बहुमत चाचणीच्या अगोदरच राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली प्रतक्रिया व्यक्त केली असून हुकूमशाही व मनमानीच्या अंताची ही सुरुवात आहे. कर्नाटकात जे घडले ते लोकशाहीविरोधी होते तसेच आपण कोणत्याही मार्गाने निवडणुका जिंकू शकतो व सत्ता आणू शकतो या विकृतीचा हा पराभव असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

दरम्यान बहूमत सिद्ध करण्यासाठी सर्व प्रयत्न केल्यानंतरही पराभव स्वीकारावा लागल्यानं भाजप तोंडावर पडलं असल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर शिवसेनेह विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

 मनसेनं फोडले फटाके

कर्नाटक विधानसभेत भाजप बहुमत सिद्ध न करू शकल्यामुळे मनसेनं फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्या दादर येथील जनसंपर्क कार्यालयाबाहेर फटाके फोडण्यात आले असून लोकशाही जिंकल्याचा हा आनंद असल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS