दिल्ली – शिवसेना सध्या राज्यातील सत्तेत वाटेकरी आहे परंतु सरकार मात्र आमचे नसल्याची भावना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. वर्षभरात सत्तेतून शिवसेना बाहेर पडणार असल्याचं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला पाठिंबा देत संजय राऊत यांनीही शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार असल्याचे संकेत दिले आहेत.
संपूर्ण पक्षाची हीच भावना असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.आदित्य ठाकरे जे बोलले आहेत त्या गोष्टी यापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडण्यात आल्या आहेत. संपूर्ण पक्षाची हीच भावना आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यातील संबंधात दुरावा आल्याची बाब सगळ्यांनाच माहिती असल्याचही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेना सध्या राज्यातील सत्तेत वाटेकरी असली तरी सरकार मात्र आमचे नसल्याची भावना यावेळी संजय राऊत यांनी बोलून दाखवली.त्यामुळे संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत.
COMMENTS