मुंबई – लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा काही दिवसांपूर्वीच पार पडला. आता सर्वांचे डोळे निकालाकडे लागले आहेत. येत्या 23 तारखेला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. परंतु लोकसभेच्या निकालापूर्वीच आता राजकीय नेत्यांचं मिशन विधानसभा सुरु झालं आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं पाहायला मिळत आहे. शरद पवार यांनी 4 मे रोजी मुंबईत पक्षाची बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.
दरम्यान शरद पवार यांनी मुंबईत पक्षाच्या आमदार आणि जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीच्या या बैठकीला लोकसभा लढवलेल्या उमेदवारांना देखील बोलवण्यात आलं आहे. त्यामुळे यावेळी लोकसभेच्या निवडणुकीत घडलेल्या घटनांचाही आढावा घेतला जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS