मुंबई – मातोश्री’ बॉम्बने उडवून शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या हत्येचा कट होता, शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना माहिती दिल्यानंतर ठाकरे कुटुंबाने ‘मातोश्री’ बंगला सोडल्याचा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे. नारायण राणे यांनी ‘No Hold Barred : My Years in Politics’ नावाचे आपले आत्मचरित्र लिहले आहे. यात त्यांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत.
दरम्यान, नारायण राणे यांनी आपल्या आत्मचरित्रातून अनेक वादळी खुलासे केले आहेत. ‘मातोश्री’ बॉम्बने उडवून अज्ञातांचा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या हत्येचा कट होता, असा खळबळजनक दावा नारायण राणेंनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे. तसेच नारायण राणेंना पक्षात ठेवल्यास बायकोसह घर सोडेन, अशी धमकी उद्धव ठाकरेंनी दिवंगत शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना दिली होती, असा खळबळजनक दावाही नारायण राणेंनी केला आहे. त्यामुळे राणे यांच्या आत्मचरित्राची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
COMMENTS