सरकारच्या कारभाराचा तरुणानं सांगितला किस्सा, शरद  पवारांना आवरलं नाही हसू !

सरकारच्या कारभाराचा तरुणानं सांगितला किस्सा, शरद पवारांना आवरलं नाही हसू !

सोलापूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दुष्काळी दौय्रावर आहेत. आज संगोला तालुक्याचा दौरा पवारांनी केला. यावेळी त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकय्रांशी चर्चा केली. यादरम्यान एका तरुणानं सरकारच्या कारभाराचा किस्सा सांगितला. साहेब मला कर्जमाफी झाल्याचा मेसेज आला आहे. काय मेसेज आला? कर्जमाफीचा, पवार म्हणाले परत कर्जमाफी झाली का? तेवढ्यात तो तरुण म्हणाला आम्हाला शेतच नाही, कर्जही घेतलं नाही, परंतू तरीही कर्जमाफी झाल्याचा मेसेज आला. हे ऐकताच पवारांसह सर्वच जण हसू लागले. दरम्यान कर्ज घेतलं नाही तरीही या तरुणाला बँकेचा मेसेज कसा आला असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

पवारांनी घेतली तरुणाची फिरकी

त्या तरुणाची पवारांनी चांगलीच फिरकी घेतली आहे. झालं असं की दुष्काळी दौय्रादरम्यान सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी येथे एक तरुण पवारांसोबत बोलण्याचा प्रयत्न करत होता. मला कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नाही असं गाऱ्हाणं तो मांडत होता. हा तरुण  हातात घड्याळ आणि गाडीची चावी कमरेला लावून आला होता. त्याला पाहून शरद पवारांनी या तरुणाची चांगलीच फिरकी  घेतली. “चावी  कशाची आहे, कोणत्या गाडीची आहे? घड्याळ कुठल्या कंपनीचं आहे?” अशा प्रश्नांची सरबत्ती पवारांनी त्याच्यावर केली.  हा तरुण बुलेटवरुन आला होता. पवारांनी प्रश्नांचा भडीमार केल्यावर तरुणाची बोलतीच बंद झाली.

COMMENTS