फवारणीमुळे शेतकऱ्यांच्या मृत्यूला कृषी मंत्रालय जबाबदार  – शरद पवार

फवारणीमुळे शेतकऱ्यांच्या मृत्यूला कृषी मंत्रालय जबाबदार – शरद पवार

नागपूर – गेल्या 1-2 वर्षात बाजारात बंदी असलेली कीटकनाशकं विक्रीसाठी येऊ लागली आहेत. अशा कीटकनाशकांमुळेच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. ज्या शेतकऱ्यांचा फवारणीमुळे मृत्यू झाला आहे त्याला केवळ कृषी मंत्रालय जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. ते नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

गेल्या 15 दिवसात यवतमाळमध्ये कापूस पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा झाल्याने अनेक शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणी पवारांनी थेट कृषी मंत्रालयाला जबाबदार धरले आहे. आघाडी सरकारच्या काळात फवारणीदरम्यान एकाही शेतकऱ्याचा मृत्यू झाला नसल्याचा दावाही पवारांनी केला. कीटकनाशकांच्या नियंत्रणासाठी कायदा आणि स्वतंत्र व्यवस्था आहे. मात्र त्याची योग्य अंमलबजावणी होत नाही. हा कृषी मंत्रालयाचा दोष असल्याचे पवार म्हणाले.

COMMENTS