बोंडअळीग्रस्तांना सरकारकडून मदत जाहीर !

बोंडअळीग्रस्तांना सरकारकडून मदत जाहीर !

नागपूर- राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी बोंडअळीमुळे त्रस्त झाले आहेत. या शेतक-यांना मदत देण्याची मागणी विरोधकांनी हिवाळी अधिवेशनात केली होती. त्यासाठी मोठा मोर्चाही काढण्यात आला होता. विरोधकांच्या या मागणीला अखेर यश आलं असून बोंडअळीग्रस्त शेतक-यांना सरकारनं मदत जाहीर केली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भरपाईपोटी ३० ते ३७ हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. कोरडवाहू क्षेत्रातील कापसासाठी हेक्टरी ३० हजार ८०० रुपये तर बागायती क्षेत्रासाठी दोन हेक्टरमागे ३७ हजार ५०० रुपये मदतीची घोषणा कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी विधानसभेत केली आहे.

तसेच ओखी वादळामुळेही अनेक शेतक-यांचं नुकसान झालं आहे. या शेतक-यांनाही सरकारनं मदत जाहीर केली असून कोकणातील फळपिकांसाठी हेक्टरी ४३ हजार तर भाजीपाल्यासाठी हेक्टरी १३ हजार ५०० रूपये मदत जाहीर केली आहे. विदर्भात आणि अन्य भागांत धानावर तुडतुडय़ांचा प्रादुर्भाव झाल्याने त्यासाठी हेक्टरी ७८७० रूपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच धानाच्या बोनसपोटी ५०क्विंटलच्या मर्यादेत प्रती क्विंटल २०० रूपये अनुदानाची घोषणाही  पांडूरंग फुंडकर यांनी केली आहे.

COMMENTS