माझी प्रकृती उत्तम, काळजी करण्याचे कारण नाही – सुधीर मुनगंटीवार

माझी प्रकृती उत्तम, काळजी करण्याचे कारण नाही – सुधीर मुनगंटीवार

मुंबई – गेली एक महिन्यापासून आजारी असलेल्या अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी जनतेशी पहिल्यांदाच संवाद साधला आहे. ट्वीटरच्या माध्यमातून त्यांनी आपल्या हितचिंतकांशी संवाद साधला असून माझी प्रकृती आता स्थिर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. स्वरयंत्रावर सूज आल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना मौन बाळगण्याचा सल्ला दिला होता.

गेली एक महिन्यापासून सुधीर मुनगंटीवार यांची प्रकृती बिघडली होती. त्यांच्या स्वरयंत्रावर सूज आल्यामुळे त्यांना कोणाशीही संवाद साधता येत नव्हता. त्यामुळे ते गेली एक महिन्यापासून मौन अवस्थेत होते. त्यानंतर आता त्यांच्या स्वरयंत्रावरची सूज कमी झाली आहे. त्यामुळे त्यांनी ट्वीटरद्वारे जनतेशी संवाद साधत काळजी करण्याचे काहीही कारण नसून माझी प्रकृती उत्तम असल्याचं ते म्हणाले आहेत.

 

COMMENTS