देशाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले, सुप्रिम कोर्टाच्या 4 न्यायाधिशांनी घेतली पत्रकार परिषद, म्हणाले लोकशाही धोक्यात आहे !

देशाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले, सुप्रिम कोर्टाच्या 4 न्यायाधिशांनी घेतली पत्रकार परिषद, म्हणाले लोकशाही धोक्यात आहे !

नवी दिल्ली – आज देशाच्या इतिसाहात पहिल्यांदाचं असे घडले की सर्वोच्य न्यायालयाच्या न्यायधिशांनी चक्क पत्रकार परिषद घेतली. आणि देशातील लोकशाही धोक्यात असल्याचं सांगितलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या चार न्यायाधिशांनी थेट सुप्रिम कोर्टाच्या निर्णयावर तोफ डागली आहे. देशात न्यायव्यवस्था टिकली तर लोकशाही टिकेल असंही त्यांनी सांगितलं.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जस्ती चेलमेश्वर, रंजन गोगोई, मदन लोकूर आणि कुरियन जोसेफ या चार न्यायाधीशांनी अचानक पत्रकार परिषद बोलावून सर्वोच्च न्यायालयाच्या कारभारावर चिंता व्यक्त करत मुख्य न्यायाधीशांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्हं उपस्थित केले. गेल्या दोन महिन्यांपासून सर्वोच्य न्यायालयाचे कामकाज व्यवस्थित सुरू नाही. याबाबत आम्ही मुख्य न्यायाधिशांकडे सर्व प्रश्न मांडले. मात्र काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे आम्ही पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेतला असंही त्यांनी सांगितलं. सर्वोच्य न्यायालयातील गेल्या काही दिवसातील निर्णय जाहीर करणार असल्याचंही न्यायाधिशांनी सांगितलं आहे.

 

COMMENTS