ठाणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यातील गडकरी रंगायतन समोरील रस्त्यावर सायंकाळी 6 वाजता जाहीर सभा होणार आहे. मनसेने सुचवलेल्या जागांना पोलिसांनी नकार दिल्याने या अरुंद रस्त्यावर ठाकरे यांची सभा होणार आहे.
एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या अपघातानंतर मनसेने फेरीवालाविरोधी आंदोलन सुरू केले. त्यात पदाधिकारी, कार्यकर्त्यांना झालेली अटक, मुंबईतील मनसे नगरसेवकांनी पक्षाला दिलेली सोडचिठ्ठी आदी विषयांवर राज ठाकरे बोलतील, अशी अपेक्षा आहे. सुमारे 40 ते 45 हजार लोक या सभेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
COMMENTS