तुकाराम मुंढेंसह राज्यातील सहा सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या !

तुकाराम मुंढेंसह राज्यातील सहा सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या !

मुंबई – पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची अखेर बदली करण्यात आली आहे. तसेच मुंढे यांच्यासह सहा सनदी अधिका-यांची बदली करण्यात आली असून नाशिक महापालिका आयुक्तपदी तुकाराम मुंढेंची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक के व्ही. कुरुंडकर यांचीही बदली करण्यात आली असून, महाराष्ट्र राज्य परिवहन विकास महामंडळ, (एडीएफ), कृषी आणि एडीएफ विभागाच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नैना गुंडे, यांची पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रेरणा देशबहरतर, यांची सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, याठिकाणी उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर दीपक कुमार मीणा यांची महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ (महाड), मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे.

COMMENTS