एटीकेटी, बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांनो चिंता करु नका, आम्हाला तुमचीही काळजी आहे – उदय सामंत

एटीकेटी, बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांनो चिंता करु नका, आम्हाला तुमचीही काळजी आहे – उदय सामंत

मुंबई – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एटीकेटी आणि बॅकलॉगबाबत विद्यार्थ्यांच्या मनात असलेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी चिंता करू नये. विद्यार्थ्यांची सरकारला काळजी आहे. यावर मार्ग काढण्यासाठी चर्चा सुरु असून योग्य वेळी विद्यार्थी हिताचा निर्णय जाहीर करू, असे सामंत यांनी म्हटलं आहे.

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय सरकारनं जाहीर केला आहे. राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना दोन पर्याय दिले आहेत. त्यापैकी पहिला म्हणजे परीक्षा न घेता आतापर्यंतच्या सेमिस्टरच्या गुणांची सरासरी काढून श्रेणी देऊन विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्याचा पर्याय आहे. तर ज्यांना हा पर्याय अन्यायकारक वाटतो त्यांना नंतर परीक्षा देण्याचा पर्यायही सरकारने दिला आहे. कोरोनाचे संकट पाहता जेव्हा परीक्षा घेणं शक्य होईल, तेव्हा विद्यार्थी परीक्षा देऊ शकतील असं सरकारनं म्हटलं आहे.

परंतु सरकारचा हा निर्णय सपशेल चुकीचा असून अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असल्याची भूमिका भाजपने घेतली आहे. भाजप नेते आशिश शेलार यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. गुण सुधारणेबाबत घेतलेल्या निर्णयात स्पष्टता नसून तो गोंधळ वाढवणारा आणि साफ चुकीचा निर्णय असल्याची टीका शेलार यांनी केली आहे.

तसेच एटीकेटी आणि बॅकलॉगबाबत विद्यार्थ्यांच्या मनात शंका आहेत. परंतु त्याबाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.

COMMENTS