मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार उदयनराजे भोसले यांना आगामी लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाणार की नाही याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत अजून कोणताही निर्णय घेतला नसल्याचं चित्र आहे. परंतु अशातच उदयनराजे यांना दुस-या पक्षांकडून ऑफर दिल्या जात आहेत.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उदयनराजे यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली होती. त्यानंतर आज आमदार नितेश राणे यांनी उदयनराजेंना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे.
उदयनराजे एक ताकदवर नेते आहेत..आमचे चांगले मित्र आहेत..
मी लवकरच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षत जात आहे ..
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात त्यांच ही स्वागत आहे!— nitesh rane (@NiteshNRane) October 8, 2018
उदयनराजे एक ताकदवर नेते आहेत. आमचे चांगले मित्र आहेत. मी लवकरच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षत जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात त्यांचही स्वागत असल्याचं ट्वीट नितेश राणे यांनी केलं आहे. त्यामुळे उदयनराजे हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात जाणार का अशी चर्च सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
COMMENTS