मुख्यमंत्री, शब्द पाळा, मराठा तरुणांवरील गुन्हे मागे घ्या – उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री, शब्द पाळा, मराठा तरुणांवरील गुन्हे मागे घ्या – उद्धव ठाकरे

मुंबई – मराठा समाजातील तरुणांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मराठा तरुणांवर आंदोलनादरम्यान दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचं वक्तव्य केलं आहे.माझ्यासोबत मराठा समाजाचे तरूण बसले आहेत. हा समाज रस्त्यावर उतरला आहे.आंदोलन शांततेत चाललं होतं पण कोणी लक्ष दिलं नाही. त्यामुळे ठोक मोर्चा निघाले.महाराष्ट्र पेटवणारा कोणीही शिवरायांचा मावळा असेल. काही लोकांनी हिंसा केली पण विनाकारण काही लोकांना त्रास दिला जातोय. तसेच तरुणांवरील गुन्हे मागे घेतले जातील असं सांगितलं होतं पण तसे आदेश कुठल्याही पोलीस स्टेशनला दिले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना हेच सांगतोय तुम्ही दिलेला शब्द पाळा असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सणासुदीचे दिवस आले आहेत, लोकांची धरपकड सुरु आहे. त्यांना त्रास देऊ नका असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच शिवसेना मराठा समाजासोबत आहे. हिंसाचार हा भाग वेगळा आहे.तसेच कोपर्डी प्रकरणाविषयी उज्ज्वल निकम यांची नेमणूक करुन लवकरात लवकर आरोपींना फाशी देण्याची मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

COMMENTS