उध्द्व ठाकरे जाणार सिंधुदुर्गच्या दौ-यावर !

उध्द्व ठाकरे जाणार सिंधुदुर्गच्या दौ-यावर !

मुंबई –  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्गच्या दौ-यावर जाणार आहेत. याबाबतचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून उद्धव ठाकरे यांचा 10 आणि 11 मार्चरोजी सिंधुदुर्ग दौरा असणार आहे. पक्ष संघटना बांधणीच्या दृष्टीनं ते सिंधुदुर्गच्या दौ-यावर जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच यादरम्यान ते नाणार येथील ग्रामस्थांना भेटणार असल्याची देखील चर्चा असून ते सिंधुदुर्गमध्ये जाहीर सभाही घेणार आहेत.

दरम्यान नाणार येथील रिफायनरी प्रकल्प सध्या गाजत असून या प्रकल्पासंदर्भात ते नाणार येथील ग्रामस्थांना भेटणार असल्याचं बोललं जात आहे. यापूर्वीही नाणार येथील प्रकल्पासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यामुळे या दौ-यादरम्यान ते नाणार प्रकल्पाबाबत नेमकी कोणती भूमिका मांडणार आहेत याकडे कोकणवासियांचं लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS