केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार, मित्रपक्षांना खूश करण्यासाठी शिवसेनेसह इतर मित्रपक्षांना मंत्रिपदाची ऑफर !

केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार, मित्रपक्षांना खूश करण्यासाठी शिवसेनेसह इतर मित्रपक्षांना मंत्रिपदाची ऑफर !

नवी दिल्ली – भाजपनं केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. जुलैमध्ये केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून या विस्तारासाठी  शिवसेनेला केंद्रात कॅबिनेट देण्यास भाजप तयार असल्याची माहिती आहे. यासाठी अमित शाह स्वतः उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. शिवसेनेने भाजपसोबत लोकसभा लढवावी अशी भाजप नेत्यांची इच्छा असल्यामुळे शिवसेनेला ही ऑफर देणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान एनडीए सरकारचा हा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून एनडीएतील मित्र पक्षांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न भाजप या विस्तारात करणार आहे. यासाठी भाजपकडून एनडीएतील घटक पक्षांना विस्तारात स्थान दिलं जाणार आहे. टीडीपी सरकारमधून बाहेर पडल्यामुळे टीडीपीच्या वाट्याचे मंत्रीपद मित्रपक्षांना दिले जाणार असल्याची माहिती आहे. यामध्ये नीतीश कुमार यांच्या जेडीयूला कॅबिनेट मंत्रीपद दिले जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपची ही ऑफर शिवसेना मान्य करणार का याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS