मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी उपसभापती वंसत डावखरे यांचे आज निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर मुंबईतल्या बॉम्ब हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आज रात्री हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. ते 68 वर्षांचे होते. उद्या ठाण्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निरंजन डावखरे यांचे ते वडील होते. शरद पवारांचे ते अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती.
लोकनेते आणि माजी गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांचे सचिव म्हणून डावखरे यांनी त्यांच्या कारकिर्दिला सुरुवात केली होती. 1986 साली ते ठाण्यातून नगरसेवक झाले. तर 1987 साली ते ठाण्याचे महापौर झाले होते. 2010 मध्ये पहिल्यांदा ते विधान परिषदेवर निवडूण आले होते. शिवसेनेशी असलेल्या घनिष्ट संबंधामुळे त्यावेळी शिवसेनेने आपला उमेदवार मागे घेतला होता.
COMMENTS