केवळ विरोधक एकत्र आल्याने नव्हे तर सरकारविरोधीतील नाराजीमुळेच भाजपचा पराभव ! वाचा आकडेवारीसह पोटनिवडणुकीचे सविस्तर विश्लेषण !

केवळ विरोधक एकत्र आल्याने नव्हे तर सरकारविरोधीतील नाराजीमुळेच भाजपचा पराभव ! वाचा आकडेवारीसह पोटनिवडणुकीचे सविस्तर विश्लेषण !

उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या दोन महत्वपूर्ण पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला. या दोन्ही जागा भाजपच्य दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या होत्या. एक जागा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्यामुळं रिक्त झाली होती. तर दुसरी जागा उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाली होती. भाजपनं त्यादृष्टीनं तिथं जोरदार तयारी केली होती. मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही. अतिआत्मविश्वास, विरोधकांची ऐकी अशा विविध प्रकारे भाजपच्या पराभवाचं विश्लेषण केलं जात आहे. मात्र आकडेवारीवर नजर टाकल्यास विरोधक एकत्र आल्यामुळे विजय झाला हे म्हणणं योग्य ठरत नाहीत.
फूलपूर मतदारसंघात 2014 मध्ये भाजपच्या केशव प्रसाद मौर्या यांना मिळालेली मते ही समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्या उमेदवारांच्या एकत्रित मतांपेक्षा तब्बल 1 लाख 44 हजार मतांनी जास्त होती. त्यामुळे सपा आणि बसपा एकत्र आले तरी भाजपचा उमेदवार 1 लाख 44 हजार मतांनी विजयी व्हायला हवा होता. मात्र तसं न होता. भाजपचा उमेदवार तब्बल सुमारे 60 हजार मतांनी पराभूत झाला. याचाच अर्थ भाजपची मते तब्बल 2 लाखांपेक्षा जास्त मते कमी झाली.

दुसरीकडे गोरखपूर हा भाजपचा आणि पर्यायाने योगी आदित्यनाथ यांचा गड मानला जातो. 1998 पासून सलग ते या मतदारसंघातून निवडूण येत आहेत. 2014 मध्ये योगी आदित्यनाथ यांना तब्बल 50 टक्क्यांपेक्षा जास्त मते होती. म्हणज्येच सर्व विरोधक एकत्र केले तरी त्यांची बेरीज 50 टक्क्याच्या आतच होते. आतातर योगी आदित्यनाथ यांचं प्रमोशन झालं आहे. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात भाजपची आघाडी वाढायला हवी होती. मात्र तसं झालं नाही. उलट सुमारे 21 हजार मतांनी भाजपचा उमेदवार पडला. त्यामुळे केवळ विरोध एकत्र आल्यामुळे भाजप हरला असं नाही तर विविध कारणांसोबत केंद्रातील आणि राज्यातील सरकारविरोधात कौल जनतेला दिला आहे हे नक्की !

गोरखपूर – 2014 मध्ये मिळालेली मते

भाजप – 5,39,127
सपा – 2,26,224
बसपा – 1,76,412
सपा बसपाची एकत्रित केलेली मते ही – 4,02,636

याचाच अर्थ 2014 मध्ये सपा आणि बसपाची मते एकत्रित केली तरीही भाजपच्या उमेदवाराची मते ही सुमारे 1 लाख 36491 हजार मते अधिकची आहेत.
फूलपूरमध्ये 2014 मध्ये मिळालेली मते
भाजप – 5,03,564
सपा – 1,95,256
बसपा – 1,63,710
सपा – बसपा एकत्रित मते – 3,58,966
याचाच अर्थ 2014 मध्ये सपा आणि बसपाच्या एकत्रित मतांपेक्षा भाजपची मते ही 1,44,598 अधिकची आहेत.

COMMENTS