मुंबई – राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये असणा-या रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. धुळे, वर्धा व उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि विविध बारा पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांकरिता 6 एप्रिलला मतदान होणार आहे. तर 7 एप्रिल 2018 रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे. या सर्व ठिकाणी नामनिर्देशनपत्रे 17 ते 22 मार्च 2018 या कालावधीत स्वीकारली जाणार असून 18 मार्च 2018 रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नसल्याची माहिती सहारिया यांनी दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या या विभागात होणार पोटनिवडणूक
22 -चिमठाणे (ता. शिंदखेडा, जि. धुळे),
19- हमदापूर (ता. सेलू, जि. वर्धा)
आणि 30-आनाळा (ता. परंडा, जि. उस्मानाबाद)
या पंचायत समितींमध्ये होणार पोटनिवडणूक
61- पिंगुळी (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग), 87-नगाव (ता. जि. धुळे), 71-साक्री (ता. साक्री, जि. धुळे), 77-तुर्काबाद (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), 60-संवदगाव (ता. वैजापूर, जि. औरंगाबाद), 66-सगरोळी (ता. बिलोली, जि. नांदेड), 83-मारतळा (ता. लोहा, जि. नांदेड), 77-काटी (ता, तुळजापूर, जि. उस्मानाबाद), 78-सौंदड (ता. सडक-अर्जुनी, जि. गोंदिया), 92-आजंती (ता. हिंगणघाट, जि. वर्धा), 64-घुग्घुस-2 (ता. जि. चंद्रपूर) आणि 22-मानापूर (ता. आरमोरी, जि. गडचिरोली).
निवडणूक कार्यक्रमाचा तपशील
नामनिर्देशनपत्रे सादर करणे- 17 ते 22 मार्च 2018
नामनिर्देशनपत्रांची छाननी- 23 मार्च 2018
अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- 28 मार्च 2018
अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- 02 एप्रिल 2018
मतदानाचा दिनांक- 06 एप्रिल 2018
मतमोजणीचा दिनांक- 07 एप्रिल 2018
COMMENTS