अयोध्या प्रकरणी लवकरच होणार सुनावणी !

अयोध्या प्रकरणी लवकरच होणार सुनावणी !

राममंदिर आणि बाबरी मशिद वादप्रकरणी लवकारत लवकर सुनावणी होण्याची शक्यता आहे.  याप्रकरणी दोन्ही पक्षांकडून आलेल्या विविध याचिकांवर आम्ही लवकरच निर्णय घेऊ असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. हे प्रकरण 2010 पासूनच न्यायप्रविष्ट आहे.  या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर व्हावी अशी मागणी दोन्ही पक्षांकडून होते आहे. यानंतर चीफ जस्टिस जे. एस, खेहर आणि डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठानं आम्ही लवकरच निर्णय घेऊ असं म्हटलं आहे. याप्रकरणी लवकर निकाल लागावा म्हणून सुब्रमण्यम स्वामी यांनीही याचिका दाखल केली होती. त्यावेळी आमच्याकडे तूर्तास लवकर सुनावणीसाठी वेळ नाही असं कोर्टानं म्हटलं होतं. मात्र आता विविध याचिका दाखल झाल्यावर आम्ही लवकरच यावर निर्णय करू असे आज सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे.

अलहाबाद कोर्टानं वादग्रस्त 2.77 एकर जमीन तीन समान भागात वाटली जावी असं म्हणत या प्रकरणावर निकाल दिला होता. रामाची मूर्ती असलेला भाग रामजन्मभूमिसाठी, ‘राम चबुतरा’ आणि ‘सीता रसोई’ असलेला भाग निर्मोही आखाड्याला आणि तिसरा भाग सुन्नी वक्फ बोर्डाला देण्यात यावा असं अलहाबाद कोर्टानं म्हटलं होतं. मात्र हा निर्णय मान्य नसल्याचं म्हणत वक्फ बोर्डानं सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. असं असलं तरीही या निर्णयाकडे आता सात वर्षांपूर्वीचा निर्णय म्हणून पाहिलं जातं. अशात या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं लवकरात लवकर निकाल द्यावा असं दोन्ही पक्षांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS