कोल्हापूर : राजाराम साखर कारखान्याच्या सभेत कार्यकर्त्यांचा राडा

कोल्हापूर : राजाराम साखर कारखान्याच्या सभेत कार्यकर्त्यांचा राडा

कोल्हापूर – कोल्हापुरातील छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि काँग्रेसचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे कार्यकर्ते आपसात भिडले. कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या अंगावर खुर्च्या फेकून मारल्या.

राजाराम साखर कारखान्याची वार्षिक सभा आज (गुरूवार) कारखाना कार्यस्थळावर होती. या कारखान्यावर काँग्रेसचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे  काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या समर्थक सभासदांनी सभेत विविध प्रश्नांची सरबत्ती संचालकांवर करण्यास सुरूवात केली. यावेळी उडवाउडवीचे उत्तर देण्यात आल्याने सतेज पाटील यांचे कार्यकर्ते संतप्त झाले. तर महाडिक यांचेही कार्येकर्ते आक्रमक झाले. एकमेकांवर शिवी हासडत एकमेकांच्या अंगावर धावून केले. तसेच काही कार्यकर्त्यांनी खुर्च्या अंगावर फेकण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभेत तणाव पसरला.

 

COMMENTS