नारायण राणे दिल्लीला रवाना, संध्याकाळी शहांसोबत बैठकीची शक्यता !

नारायण राणे दिल्लीला रवाना, संध्याकाळी शहांसोबत बैठकीची शक्यता !

दिल्ली – माजी मुख्यमंत्री नारायण राणे दिल्लीला रवाना झाले आहेत. राणे यांनी भेटीसाठी अमित शाह यांची वेळ मागितली आहे. त्यातच आज दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक आहे. शाह  त्याच्यामध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे राणे यांना ते भेटीसाठी कोणती वेळ देतात हे अजून स्पष्ट झालेलं नाही. राणे यांच्या भाजप प्रवेशाच्याबाबत या भेटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. अर्थात राणे हे त्यांच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी शाह किंवा मोदी यांना निमंत्रण देणार असल्याचं राणे यांनी यूर्वीच स्पष्ट केलंलं आहे. तरीही राणे हे भाजप प्रवेशाची चर्चा करण्यासाठीच शाह यांना भेटणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

COMMENTS