बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे

बेस्ट उपक्रमातील 42 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आला आहे. मे महिन्यातील वेतनही फक्त 50 टक्केच मिळाल्याने संपाचे हत्यार बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी उपसले होते.
संपात सहभागी झालेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन देण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. गुरूवारी या कर्मचाऱ्यांना वेतन मिळण्याचे आश्वासन दिल्याने बेस्ट वर्कर्स युनियनकडून संप मागे घेण्यात आला. त्यामुळे बेस्टने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

 

COMMENTS