34 हजार कोटींची कर्जमाफी संशयास्पद  – राजू शेट्टी

34 हजार कोटींची कर्जमाफी संशयास्पद – राजू शेट्टी

‘राज्य सरकारने जाहीर केलेल्या 34 हजार कोटींच्या कर्जमाफीतील आकडेवारी संशयास्पद आहे. सदरच्या आकडेवारीबाबत सरकारने कोणताही संपूर्ण खुलासा केलेला नाही’, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्‌टी म्हणाले आहे.

राजू शेट्टी पुढे म्हणाले की, ‘मागील आघाडी सरकारने देशातील शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी 52 हजार कोटी रूपयांची केली होती.  ही माहिती देशाच्या सभागृहात अर्थमंत्री अरूण जेटली यांनी मी लोकसभेच्या सभागृहात विचारलेल्या प्रश्नांला उत्तर दिलं आहे. जर कोणतेही निकष न लावता संपूर्ण देशातील कर्जमाफी 52 हजार कोटींची असेल तर राज्याने जाहीर केलेली 34 हजार कोटींची आकडेवारी संशयास्पद आहे. यामुळे शासनाने जी 34 हजार कोटी रूपयांची कर्जमाफी केली आहे, या आकडेवारीची सविस्तर माहिती देऊन यामध्ये सरसकट माफ झालेली शेतकर्यांची संख्या व आकडेवारी, ज्यांना दीड लाखापर्यंत कर्जमाफी मिळालेली आहे, अशा शेतकर्यांची संख्या व आकडेवारी व 25 हजार कमाल व किमान नियमीत कर्जदार असणा-या शेतकर्यांची आकडेवारी जाहीर करावी. या कर्जमाफीत शासनाने जे निकष घातलेले आहेत त्यात अनेक शेतकर्यांची कर्जमाफी होऊ शकत नाही. मग ही एवढी 34 हजार कोटींची आकडेवारी आली कशी’ ? असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थीत केला आहे.

 

 

 

COMMENTS