GST विधेयक अधिवेशन 20, 21, 22 मे रोजी !

GST विधेयक अधिवेशन 20, 21, 22 मे रोजी !

वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीसाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन नियोजित केले आहे. 17 मे रोजी होणाऱ्या अधिवेशनाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. जीएसटी विधेयक अधिवेशन आता 17 मे ऐवजी 20,21 आणि 22  मे रोजी होणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

याविषयी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली. 18आणि 19 मे रोजी श्रीनगरमध्ये जीएसटी कौन्सिलची बैठक आयोजित केली आहे. कोणत्या वस्तू कर रचनेत येतील याचा निर्णय या बैठकीत होणार आहे. राज्याचा अर्थ मंत्री म्हणून तेथे उपस्थित राहणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

दरम्यान, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेऊन निर्णय जाहीर करु. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारची जुनी पद्धत आहे. याही वेळेस सरकार मदत करण्यासाठी सकारात्मक आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

COMMENTS