युतीचं तुम्ही कोण ठरवणारे ?, उद्धव ठाकरे ठरवतील, रामदास कदमांचा मुनगंटीवारांना टोला !

युतीचं तुम्ही कोण ठरवणारे ?, उद्धव ठाकरे ठरवतील, रामदास कदमांचा मुनगंटीवारांना टोला !

मुंबई – लोकसभेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये युती होणार असल्याचं वक्तव्य भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं. परंतु शिवसेना-भाजपच्या युतीचं तुम्ही कोण ठरवणारे, उद्धव ठाकरे ठरवतील, असा टोला शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी मुनगंटीवारांना लगावला आहे. उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीत भाजपाचे पानीपत झाल्यानंतर भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ताबडतोब विधानसभेत सांगितलं की भाजपा – शिवसेनेची युती होणार आणि युती सत्तेवर येणार, मी त्यांना एवढेच सांगेन की, याबाबतचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांना आहेत, शिवसेनेने याबाबतचा निर्णय पूर्वीच घेतला असून आगामी निवडणूक शिवसेना एकटीच लढवणरा असून विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकावणार असल्याचंही कदम यांनी म्हटलं आहे.

तसेच आता अगदीच नाईलाज झालाय म्हणून शिवसेनेशी युती करणार हे जे डोक्यात शिजतंय ते कृपा करून काढून टाका, तुम्ही आमच्या टेकूवर सत्ता उपभोगताय आणि जशी आम्हाला वागणूक देताय ते महाराष्ट्र विसरणार नसून ये तो एक झाँकी है, आगे बहुत कुछ बाकी है हे मुनगुंटीवार आणि भाजपा नेत्यांना लवकरच समजणार असल्याचंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

COMMENTS